
अलिबाग जवळच्या समुद्रात १३० प्रवासी असलेल्या बोटीला छिद्र, पाणी शिरल्याने एकच खळबळ; समुद्रातील मोठी दुर्घटना टळली
अलिबाग जवळच्या समुद्रात मोठी बोट दुर्घटना टळली आहे. मांडवा जेट्टी शेजारी ही मोठी दुर्घटना टळली आहे. बोटीमध्ये छिद्र पडल्याने त्यात पाणी शिरायला सुरुवात झाली होती.त्यावेळी बोटीमध्ये तब्बल १३० प्रवासी होते. मात्र, प्रसंगावधान राखत १३० प्रवाशांना सुरक्षित दुसऱ्या बोटीत हलवण्यात आलं, आणि मोठी दुर्घटना टळली. संध्याकाळी पाच ते साडेपाच वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. यादरम्यान, मांडवा सागरी पोलिसांनी या घटनेला दुजोरा दिला आहे.