
मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्रात सहा महिन्यांच्या प्रशिक्षण सत्राचे आयोजन29 डिसेंबरपर्यंत युवकांनी अर्ज करावेत
रत्नागिरी, दि. 5 ): मत्स्यव्यवसाय विभागामार्फत आयोजित करण्यात येणारे सहा महिन्यांचे सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व सागरी इंजिन देखभाल व परिचालन प्रशिक्षण 1 जानेवारी 2026 पासून मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र, रत्नागिरी येथे सुरु होत आहे. सदर प्रशिक्षणसाठी 29 डिसेंबर 2025 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक युवकांनी प्रशिक्षण केंद्राशी किंवा मोबाईल व व्हॉटस्अप क्रमांक 9422371901 अथवा ई-मेल आयडी ftcrtn@gmail.com वर संपर्क साधावा, असे आवाहन मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी जी. द. सावंत यांनी केले आहे.
प्रशिक्षणासाठी उमेदवाराचे वय 18 ते 35 वर्ष, उमेदवार किमान चौथी पास, क्रियाशिल मच्छिमार व किमान एक वर्ष मासेमारीचा अनुभव आवश्यक असणार आहे. प्रशिक्षणाचे शुल्क प्रतिमाह 450 रुपये प्रमाणे सहा महिन्यांचे 2 हजार 700 रुपये व दारिद्रयरेषेखालील उमेदवारांसाठी प्रतिमाह 100 रुपये प्रमाणे सहा महिन्यांचे 600 रुपये आहे. आधारकार्ड, रेशनकार्ड व शाळा सोडल्याच्या दाखल्याची छायाप्रत, दारिद्रयरेषेखालील असल्यास ग्रामसेवक/गटविकास अधिकारी यांचा दाखला जोडणे आवश्यक आहे.
प्रशिक्षणानंतर राष्ट्रीय सहकार विकास निगम (एनसीडीसी) अंतर्गत योजनेतून अर्थसहाय्य घेवून मच्छिमारी नौका बांधता येतील तसेच सागरी नौकांवर पात्रतेनुसार खलाशी म्हणून रोजगाराच्या संधी उपलब्ध होवू शकतात. अर्ज स्वत:चे हस्ताक्षरात भरुन त्यावर मच्छिमार संस्थेची शिफारस घेवून अर्ज सादर करावेत.




