
चिपळूण शहरातील शंकरवाडीतील रस्ता ९ मीटर करण्याची मागणी
चिपळूण शहरातील रामेश्वर मंदिर ते धामणस्कर चौक या शंकरवाडी भागातील शहर विकास आराखड्यातील नियोजित रस्त्याचे १२ मीटर रूंदीकरण केले जात आहे. यासाठी पालिका प्रशासनाने रस्त्यालगतची बांधकामे, वृक्ष व अन्य अडथळे तोडण्यास सुरूवात केली आहे. या कारवाईत अनेक रहिवाशांच्या जागा बाधित होत असल्याने स्थानिक जमीन मालक आक्रमक झाले आहेत. सोमवारी या जमीन मालकांनी माजी आमदार रमेशभाई कदम यांच्या नेतृत्वाखाली नगर पालिकेवर धडक देत प्रशासनाला जाब विचारला. जमिनमालकांना योग्य मोबदला देण्याबरोबरच तो रस्ता ९ मीटरचा करावा, अशी एकमुखी मागणी करण्यात आली. त्यामुळे आता याविषयी धोरणात्मक निर्णय घेण्याच्या दृष्टीने येत्या दोन दिवसात पुन्हा बैठक घेण्याचे ठरले आहे.www.konkantoday.com