कोच्युवेली एक्सप्रेस गाडी चक्क १७ तास लेट, प्रवासी हैराण
उन्हाळी सुट्टी हंगामामुळे कोकण मार्गावरून धावणार्या नियमित गाड्यांसह एक्सप्रेस गाड्या हाऊसफुल्ल धावत असतानाच त्यात विलंबाच्या प्रवासाची भर कायम आहे. कोकण मार्गावरून धावणार्या १२४८४ क्रमांकाच्याा कोच्युवेली एक्सप्रेसला मंगळवारी तब्बल १७ तासांचा लेटमार्क मिळाला. या मागचे नेमके कारण समजू शकले नाही. अन्य ७ रेल्वेगाड्यांचे वेळापत्रकही विस्कळीत होवून झालेल्या रखडपट्टीने प्रवासी हैराण झाले. ०९०५८ क्रमांकाची मंगळूर-उधना स्पेशल परतीच्या प्रवासातही ४ तास उशिराने मार्गस्थ झाल्याने प्रवाशांचा मनस्ताप कायम राहिला. १०१०६ क्रमांकाची सावंतवाडी-दिवा पॅसेंजर १ तास २० मिनिटे, तर ११०९९ क्रमांकाची एलटीटी-मडगाव एक्सप्रेस २ तास उशिराने रवाना झाली. १६३३४ क्रमांकाची तिरूवअनंतपूरम-वेरावळ एक्सप्रेस १ तास, तर १६३४६ क्रमांकाची तिरूवअनंतपुरम-एलटीटी नेत्रावती एक्सप्रेस ३ तास विलंबाने धावली. १९५७७ जामनगर एक्सप्रेस २ तास, तर २२६५५४ क्रमांकाची निजामुद्दीन तिरूवअनंतपुरम साप्ताहिक एक्सप्रेस ३ तास उशिराने रवाना झाली.www.konkantoday.com