
अपुर्या कामामुळे पावसाळ्यात मिर्या-नागपूर महामार्ग धोकादायक बनण्याची शक्यता
मिर्या-नागपूर महामार्गाचे काम सध्या संथगतीने सुरू आहे. हातखंबा ते साळवी स्टॉप त्यापुढे पाली ते मलकापूर हे कााम सुरू आहे. पावसाळा तोंडावर आला तरी ४० टक्के कामही झालेले नाही. यामुळे पावसाळ्यात अनेक ठिकाणी वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.कोट्यवधी रुपये खर्च करून मिर्या-नागपूर महामार्गाचे चौपदरीकरण सुरू आहे. मिर्यापासून चौपदरीकरणाचे काम सुरू झाले आहे. मिर्या, साळवी स्टॉप, कुवारबांव कारवांचीवाडी, खेडशी, हातखंबा, पाली, नाणीज, साखरपा, आंबा घाटाचे काम सध्या सुरू आहे. आंबा घाटही एका बाजूने कटींग केला आहे. सादारण डिसेंबरनंतर या कामाला सुरूवात झाली. मोठी झाडे तोडल्यानंतर रूंदीकरण व रस्ता कटाई कामाला प्रारंभ झाला. येत्या काही दिवसात पावसाळा सुरू होणार आहे. त्या अनुषंगाने कंपनीने पावले टाकण्याची गरज आहे. मोठे मातीचे ढीग करून मातीचे रस्ते तयार केले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात चिखल होवून अपघात होण्याची शक्यता आहे. www.konkantoday.com