
रत्नागिरी शहरातील चंद्रशेखर करंदीकर यांचे निधन
रत्नागिरी शहरातील पटवर्धन हायस्कूलचे माजी विद्यार्थी तथा भारत शिक्षण मंडळाचे ज्येष्ठ पदाधिकारी चंद्रशेखर करंदीकर यांचे १९ मे रोजी मुंबईत रुग्णालयात निधन झाले. ते ६४ वर्षांचे होते.ते न्यू इंडिया ऍश्युरन्समध्ये विकास अधिकारी आणि प्रबंधक म्हणून विमा क्षेत्रात कार्यरत होते. करंदीकर यांनी भारत शिक्षण मंडळाच्या बालवाडी विभागाचे अध्यक्ष म्हणून आणि संस्थेचे विश्वस्त म्हणून काम पाहिले. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन विवाहित मुलगा आणि मुलगी आहे.www.konkantoday.com