खेड पोलिसांची धडाकेबाज कारवाई,म्हसळ्याच्या जंगल परिसरात लपून बसलेल्या दरोडा प्रकरणातील आणखी पाच आरोपींना केली अटक

खेड येथील दरोडाप्रकरणी खेड पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत म्हसाळा जंगलातून या दरोडा प्रकरणातील पाच आरोपींना अटक केली आहे.खेड येथेदिनांक १६ सप्टेंबर रोजी पडलेल्या ५९ लाख रुपयाच्या दरोड्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी खेड श्री प्रवीण पाटील व पोलीस निरीक्षक श्रीमती सुवर्णा पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली खेड पोलिसांची तपास पथके वेगवेगळ्या ठिकाणी रवाना झाली होती.
पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कदम यांचे पथक रायगड जिल्ह्यामध्ये तपास करीत असताना त्यांना शास्त्रीय व तांत्रिक तपासाच्या आधारे माहिती मिळाली की गुन्ह्यातील काही आरोपी म्हसळा परिसरात असण्याची शक्यता आहे. त्यामुळे सदर पथक तात्काळ म्हसळा येथे रवाना झाले. म्हसळा परिसरात शोध घेतल्यानंतर आरोपींचा काहीही थांगपत्ता लागेना त्यामुळे गोपनीय माहिती काढल्यानंतर असे समजले की आरोपी यांचा मोबाईलचा रिचार्ज संपला आहे त्यामुळे तो कोणाशी संपर्क साधू शकत नाही.
पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कदम यांनी तात्काळ सदर आरोपी याच्या मोबाईलवर पन्नास रुपयाचा रिचार्ज मारला. रिचार्ज मारल्यानंतर काही वेळातच आरोपी याचा त्याच्या भावाशी संपर्क झाला त्यामुळे समजले की आरोपि हे म्हसळ्याच्या जंगल परिसरात लपून बसलेले आहेत. पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कदम यांनी जंगल परिसरात सापळा रचला व जंगलात लपून बसलेले पाच आरोपी यांना ताब्यात घेतले आणि खेड पोलीस स्टेशन येथे पुढील तपास कामी घेऊन आले. या आरोपींकडून सुमारे एक लाख ३९ रुपये, पाच मोबाईल फोन व एक मोटरसायकल जप्त करण्यात आलेली आहे. या गुन्ह्यातील एकूण अटक आरोपींची संख्या आता आठ झालेली आहे.
आरोपीची नावे पुढील प्रमाणे विक्रम वसंत चव्हाण, सिद्धेश विठ्ठल पवार, नरेश वसंत चव्हाण, विजय गौरीशंकर भगत, प्रमोद उर्फ बबल्या रामचंद्र चव्हाण, दीपक माणिक चव्हाण, अंकुश पंढरीनाथ पवार, मनोज रमेश जाधव. आरोपी यांच्याकडून आतापर्यंत जवळपास दोन लाख रुपये, एक कार, पाच मोटरसायकल व आठ मोबाईल जप्त करण्यात आलेले आहेत
सदर कारवाई पोलिस अधीक्षक रत्नागिरी, अप्पर पोलीस अधीक्षक रत्नागिरी, उपविभागीय पोलीस अधिकारी खेड श्री प्रवीण पाटील व पोलीस निरीक्षक खेड श्रीमती सुवर्णा पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कदम, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिवाजी बांगर, पोलीस हवालदार विजय खामकर, पोलीस हवलदार शिवराज दिवाळे, पोलीस नाईक वीरेंद्र आंबेडे, पोलीस शिपाई अजय कडू, पोलीस शिपाई रुपेश जोगी व पोलीस शिपाई साजिद नदाफ यांनी केले आहे. सदर तपासामध्ये म्हसळा पोलिसांनी अतिशय मोलाचे सहकार्य केले आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button