
गणपतीपुळेत रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीतर्फे जीवरक्षकांसाठी मनोरा
रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी यांनी कै. अथर्व धीरज वेल्हाळ यांच्या स्मरणार्थ गणपतीपुळे समुद्र किनार्यावर जीवरक्षकांसाठी टेहळणी मनोरा उभारून दिला आहे. या टेहळणी मनोर्याचे उदघाटन नुकतेच रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी यांच्या प्रमुख पदाधिकार्यांच्या उपस्थितीत करण्ययाात आले.यावेळी गणपतीपुळे ग्रामपंचायतीचे प्रमुख पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. गणपतीपुळे समुद्र किनार्यावर जीवरक्षकांसाठी गेल्या काही महिन्यापासून टेहळणी मनोरा अस्तित्वात नव्हता. त्यामुळे जीवरक्षकांची मोठी गैरसोय होत होती. ही गरज ओळखून रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी या सेवाभावी संस्थेने गणपतीपुळे समुद्र किनार्यावर टेहळणी मनोरा उभारू दिला आहे. या टेहळणी मनोर्यावरून आता जीवरक्षकांना समुद्राच्या खोल पाण्यात जाणार्या अती उत्साही पर्यटकांवर तसच समुद्र किनार्यावरील सर्वच घडामोडींवर बारीक लक्ष ठेवण्यास मदत होणार आहे. www.konkantoday.com