चिपळुणातून निघाल्या लाल परी चिपळूण ते मथुरा-वृंदावन


चिपळूण आगाराची लालपरी पंढरपूर कार्तिकी वारीसह मथुरा-वृंदावन यात्रेसाठी उद्या मार्गस्थ होत असून हा तब्बल ४२०० किलोमीटर प्रवास असून या यात्रेसाठी हरी ओम सतनाम वारकरी संप्रदाय कळंबस्ते, कामथे, आंबडस यांच्यातर्फे बुकींग करण्यात आले आहे.
ही आध्यात्मिक यात्रा पंढरपूर, सिद्धटेक, देवगड अशी महाराष्ट्र राज्यात फिरेल. यानंतर आग्रा, मथुरा, वृंदावन, गोकुळ, गोवर्धन, नंदगाव, ×उज्जैन तर परतीच्या प्रवासात सप्तशृंगगड, शिर्डी, ओझर, लेण्याद्री, आळंदी, देहू असा सुमारे ४ हजार २०० किलोमीटरचा प्रवास होणार आहे. या यात्रा प्रवाहासाठी चिपळूण एस.टी. आगारातून नवीन अद्ययावत व सुसज्ज अशी बस असणार आहे.
बारा दिवसांचा हा प्रवास १ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत चिपळूणहून पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे. आगारप्रमुख दीपक चव्हाण, कार्यशाळा प्रमुख श्री. गुढेकर व आगारातील सर्व कर्मचार्‍यांचे योगदान लाभले आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button