नकली दागिन्यांना सोन्याचा मुलामा तो सोनार ऑनलाईनवरून नकली दागिने मागवत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न
राजापूरसह रत्नागिरीतील पतसंस्थांतून गहाण ठेवलेल्या बनावट सोन्याद्वारे फसवणूक करणारा कोल्हापूर येथील तो सोनार दिल्लीहून ऑनलाईन नकली दागिने मागवत असल्याची बाब तपासात पुढे आली आहे. रत्नागिरीतील दोघांना हाताशी धरून पतसंस्था, बँकांमध्ये गहाण ठेवून कर्जाद्वारे वर्षभरात ३०० तोळे बनावट दागिने गहाण ठेवून सुमारे साडेतीन कोटींची फसवणूक केल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे.रत्नागिरी स्थानिक गुन्हे शाखेमार्फत राजापुरातील एका चोरीची चौकशी सुरू होती. त्या दरम्यान नकली सोन्याद्वारे कर्ज काढून पतसंस्था, बँकांची फसवणूक करणार्या टोळीचा पर्दाफाश पोलिसांनी केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केल्यावर तपासात त्यांच्याकडून अनेक गंभीर बाबी उघड होत आहेत.पोलिसांनी कोल्हापूर येथील सोनार अमोल पोतदार याच्यासह त्याचे साथीदार योगेश सुर्वे (रा. तुळसंदे), अमेय पाथरे (पावस) व प्रभाकर नाविक या चौघांना संशयित म्हणून अटक केलेली आहे. www.konkantoday.com