उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे बूथ एजंट मनोहर नलगे यांचा सोमवारी मतदानकेंद्रावरच दुर्देवी मृत्यू
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे बूथ एजंट मनोहर नलगे यांचा सोमवारी मतदानकेंद्रावरच दुर्देवी मृत्यू झाला. डिलाईड रोड येथील बीडीडी चाळ क्रमांक 20 च्या म्हसकर उद्यानातील पुलिंग बूथवर नलगे पोलिंग एजंट म्हणून काम करत होते.नलगे यांना अस्वस्थ वाटू लागल्यानंतर त्यांना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तिथे डॉक्टरांनी त्यांना ब्रॉट डेड म्हणजेच दाखल करण्याआधीच मृत घोषित केलं. निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मतदानकेंद्रावर पुरेश्या सोयीसुविधांचा आभाव होता. निवडणूक आयोगाने या ठिकाणी हव्या तशा सोयीसुविधा पुरवल्या नसल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे.मनोहर नलगे 62 वर्षांचे होते ते मुंबईतील डिलाईड रोड येथील एन. एम. जोशी मार्गावरील बीडीडी चाळमधील म्हसकर उद्यानाजवळ राहायला होते. सोमवारी मुंबईतील सर्व लोकसभा मतदासंघांमध्ये पाचव्या टप्प्याअंतर्गत मतदान पार पडलं. राज्यातील 13 मतदारसंघांमध्ये मुंबईतील 6 मतदारसंघांचा समावेश होता. महाराष्ट्रातील मतदानाची टक्केवारी ही सोमवारी 5 राज्यांतील एकूण 49 मतदारसंघांमध्ये झालेल्या मतदानात सर्वात निच्चांकी राहिली. मुंबईमध्ये अनेक ठिकाणी ईव्हीएममध्ये गोंधळ, मतदानासाठी वेळ लागत असल्याने लांबच लांब रांगा, विरोधक कार्यकर्ते आमने-सामने येऊन झालेली घोषणाबाजी यासारख्या गोष्टी चर्चेत राहिल्या. अनेक मतदानकेंद्रांवर पुरेश्या प्रमाणात सुविधा उपलब्ध नव्हत्या असा दावा केला जात आहे.www.konkantoday.com