
लोटे औद्योगिक वसाहतीमध्ये श्रेयस इंटर मिजिएट या रासायनिक कारखान्याची ३२ मीटर उंचीची चिमणी कोसळून कोट्यवधीचे नुकसान
खेड तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीला पाऊस व वादळीवारा यांचा जोरदार फटका बसला.औद्योगिक वसाहतीमध्ये श्रेयस इंटर मिजिएट या रासायनिक कारखान्याची ३२ मीटर उंचीची चिमणी कोसळून कोट्यवधीचे नुकसान झाले आहे.पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे लोटे औद्योगिक वसाहतीतील अनेक छोट्या मोठ्या कारखान्यांना फटका बसला. अनेक छोट्या मोठ्या कारखान्यांचे पत्रे उडाले. श्रेयस इंटरमिजिएट लिमिटेड या रासायनिक कारखान्याची ३२ मीटर उंचीची थर्मिक फ्लुईड चिमणी कारखान्याच्या आवारातील इतर तीन इमारतींवर कोसळली. सुदैवाने कोणत्याही प्रकारची मनुष्यहानी व कामगार जखमी झाले नाहीत. www.konkantoday.com