बायकोला रिक्षाचालकाने घरापर्यंत सोडले नाही याचा आला नवऱ्याला राग, रिक्षा चालकाला केली मारहाण

बायकोला अर्ध्या रस्त्यात सोडल्याच्या रागातून रिक्षाचालकाला नवऱ्याने केली दगडाने मारहाण केल्याची घटना चिपळुणातील पागझरी येथे शनिवारी सायंकाळी ७:३० वाजता घडली. या मारहाणीप्रकरणी पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद रिक्षा व्यावसायिक रणवीर दत्ताराम चव्हाण (४७, रा. शिवाजीनगर, ९ चिपळूण) यांनी दिली आहे. याप्रकरणी सागर (पूर्ण नाव, गाव माहीत नाही) नामक व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.रणवीर चव्हाण हे शनिवारी सायंकाळी शिवाजीनगर येथून पागझरी येथील साकेत अपार्टमेंट येथे भाडे सोडून परत पागझरी रस्त्याने निघून गेले. त्यानंतर मिलिटरी महिला वसतिगृहासमोरील रस्त्यावर त्यांचे मित्र रिक्षा चालक आंग्रे यांच्यासोबत ते बोलत थांबले होते. त्याचवेळी त्यांच्या परिचयाचा असलेला सागर तिथे आला. त्याने रणवीर चव्हाण यांना ‘तू माझ्या बायकोला घरापर्यंत का सोडले नाहीस, अर्ध्या वाटेतच का सोडलेस,’ असे बोलून शिवीगाळ केली. तसेच दगड उचलून त्यांच्या डोक्यात मारला. त्यामध्ये त्यांना दुखापत झाली आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button