दापोली तालुक्यातील खेर्डी येथे वृद्धाचा मृत्यू
दापोली तालुक्यातील खेर्डी येथील सुरेश केळकर (६४) हे २७ एप्रिल रोजी दापोली येथे डायलेसीस उपचारासाठी जात होते. त्यांच्या पुढे असणार्या डंपर व पिकअप या गाड्यांनी अचानक ब्रेक लावला. खेर्डी येथील रस्ता नवीन झालेला असल्यामुळे रस्त्यावर बारीक खडी होती. दुचाकी खडीवरून सरकल्यामुळे सुरेश केळकर यांच्या पायाला व डोक्याला दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी मुंबई येथे हलविण्यात आले होते. १२ मे रोजी उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. नवीन झालेल्या रस्त्यावर खेर्डी तिठा येथे गतिरोधक टाकण्याची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे.www.konkantoday.com