मुंबई विद्यापीठात विद्यार्थ्यांना गिरवता येणार आता मंदिर व्यवस्थापनाचे धडे
मुंबई विद्यापीठाने मंदिर व्यवस्थापनाचा अभ्यास सुरू करण्याचा महत्वाकांक्षी निर्णय घेतला आहे. यामुळे येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांना आता मंदिर व्यवस्थापनाचे धडे गिरवता येणार आहेत. मुंबई विद्यापीठाची हिंदू अध्यासन केंद्राच्या पुढाकारातून मंदिर व्यवस्थापनातील विषयात ६ महिन्याचे प्रमाणपत्र व १२ महिन्यांचे पदविका अभ्यासक्रम राबवले जाणार आहेत. येत्या जूनपासून या अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. याद्वारे विद्यार्थ्यांसाठी रोजगाराचे नवे दालन खुले होण्यास तितकीच मोलाची मदत होणार आहे.www.konkantoday.com