कोकण रेल्वे मार्गावरील वंदे भारतसह तेजस एक्सप्रेसचे आरक्षण अखेर खुले
कोकण मार्गावर पावसाळ्यात धावणार्या आलिशान सीएसएमटी-मडगाव वंदे भारत एक्सप्रेससह तेजस एक्सप्रेस व एलटीटी-मडगाव एक्सप्रेसच्या मान्सून वेळापत्रकाच्या आरक्षण प्रणालीतील नोंदीअभावी झालेल्या घोळामुळे १० जूनपासून धावणार्या फेर्या रद्दचा एसएमएस प्राप्त झाल्याने सारेच संभ्रमावस्थेत होते. १० जूनपासूनचे मान्सून कालवधीतील आरक्षण शुक्रवारपासून सुरू केले यामुळे बुचकळ्यात पडलेल्या प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे. www.konkantoday.com