
रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात पालकमंत्री उदय सामंत यांच्या विरोधात उबाठा कडून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष उदय बने, माजी नगराध्यक्ष बंड्या साळवी, तालुका संपर्कप्रमुख सुदर्शन तोडणकर यांच्यातून एकाची निवड होणार
_विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. आता शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघात चाचपणीला सुरूवात केली आहे. येत्या काही दिवसात प्रत्येक विधानसभा मतदार संघातील पदाधिकार्यांच्या बैठका घेण्यात येणार आहेत असे माजी खासदार विनायक राऊत म्हणाले. रत्नागिरी सगमेश्वर विधानसभा मतदार संघातून उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतर्फे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष उदय बने, माजी नगराध्यक्ष बंड्या साळवी, तालुका संपर्कप्रमुख सुदर्शन तोडणकर इच्छुक आहेत, या तिघांपैकी एकाला उमेदवारी देण्यात येईल. उमेदवार स्थानिक देण्यात येणार असल्याने माजी खासदार विनायक राऊत म्हणाले, कालच पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी संपर्कप्रमुखांचे बैठक घेतली असल्याचे त्यांनी सांगितले.