रहाटाघर बसस्थानकाचे काम वेगाने सुरू
रहाटाघर बसस्थानकाचा आधार प्रवाशांना होता. राज्य शासनाच्यावतीने रहाटाघर बसस्थानकासाठी २ कोटींचा निधी मंजूर झाला होता. बसस्थानकासाठी एमआयडीसीच्या माध्यमातून निधी प्राप्त झाल्याने वेगाने कामाला प्रारंभ करण्यात आला. लवकरच या बसस्थानकाचे काम पूर्ण झाल्याचे पहावयास मिळणार आहे. शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता शहर व ग्रामीण भागातील प्रवासी वाहतुकीसाठी दोन वेगवेगळी बसस्थानके तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. मध्यवर्ती बसस्थानक ग्रामीण भागातील वाहतुकीसाठी तर रहाटाघर येथील बसस्थानक हे शहर वाहतुकीसाठी वापरण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र मुख्य बसस्थानकापासून हे बसस्थानक लांब असल्याने प्रवाशांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. त्यामुळे पुन्हा मध्यवर्ती बसस्थानक येथूनच शहर वाहतूक सुरू ठेवण्यात आली. www.konkantoday.com