
रत्नागिरी पोलिसांच्या आंतरराष्ट्रीय कॉलिंग सेंटरप्रकरणी शुक्रवारी पनवेल येथे दोन ठिकाणी धाडी
आंतरराष्ट्रीय कॉलिंग प्रकरणात संशयित आरोपींनी समाधानकारक माहिती दिली नसली तरी रत्नागिरी पोलिसांनी राबवलेल्या यंत्रणेमुळे मुंबईतील आणखी दोन सर्व्हर पोलिसांच्या हाती लागले आहेत.सर्व्हरचा उपयोग आंतरराष्ट्रीय कॉलिंगसाठी झाला आहे का, याचा तपास आता केला जात आहे.
रत्नागिरी पोलिसांनी आंतरराष्ट्रीय कॉलिंग सेंटरप्रकरणी शुक्रवारी पनवेल येथे दोन ठिकाणी धाडी टाकल्या. या धाडीमध्ये पोलिसांना संगणकासह अन्य काही साहित्य हाती लागले आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या तपासाला आणखी गती येणार आहे.
रत्नागिरीतून बेकायदेशीर आंतरराष्ट्रीय कॉल केले असल्याची माहिती मुंबईच्या दहशतवादविरोधी पथकाकडून मिळाल्यानंतर रत्नागिरी पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले. यातील मुख्य सूत्रधार फैजल रज्जाक अली रज्जाक सिद्दीकी याने पनवेल येथे दोन कॉल सेंटर उभारल्याची माहिती चौकशीदरम्यान दिली होती
www.konkantoday.com