महेश अरविंद पोटफोडे यांची पोलीस निरीक्षक पदी पदोन्नती,रत्नागिरी त्वष्टा कासार ज्ञाती मंडळ यांच्यातर्फे सत्कार
महेश अरविंद पोटफोडे यांची पोलीस निरीक्षक पदी पदोन्नती झाली आणि ते पुणे येथे रुजू होत आहेत. या निमित्ताने रत्नागिरी त्वष्टा कासार ज्ञाती मंडळ यांच्यातर्फे शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व मिठाई देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी त्वष्टा कासार ज्ञाती मंडळ रत्नागिरीचे अध्यक्ष अनिल कृष्णा पोटफोडे ,सचिव श्री महेश मारुती कोसुंबकर ,खजिनदार श्री जितेंद्र दत्तात्रय लाखाटे, श्री मिलिंद साप्ते ट्रस्टी, श्री संकेत डेरे ट्रस्टी, सल्लागार -श्री मंगेश पोटफोडे व श्री राहुल कोसुंबकर ,श्री प्रशांत पोटफोडे, श्री. विनोद कडू उपस्थित होते.www.konkantoday.com