
पालकमंत्री ॲड. अनिल परब आज कोरोना सह विविध विषयांचा आढावा घेणार
राज्याचे परिवहन मंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री ॲड. अनिल परब आज शनिवार दिनांक १८ एप्रिल रोजी कोरोना विषाणू प्रादुर्भाव व इतर अनुषंगिक बाबींचा आढावा रत्नागिरी येथे घेणार आहेत.सकाळी साडेअकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना संदर्भात विविध अधिकाऱ्यांशी चर्चा करून येथील परिस्थितीची माहिती पालकमंत्री घेणार आहेत आगामी काळात याबाबत नियोजन कसे असावे या बाबतीतही ते यावेळी मार्गदर्शन करतील.
www.konkantoday.com