
रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे तीर्थक्षेत्रात बिबट्याचा मुक्तसंचार सुरू.
रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे तीर्थक्षेत्रात बिबट्याचा मुक्तसंचार सुरू असून दुर्घटना घडण्यापूर्वीच वन विभागाने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. गणपतीपुळे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच महेश केदार यांच्या घरासमोरील अंगणात बिबट्या रात्रीच्या वेळी फिरत असल्याचे सीसीटीव्ही कॅमेर्यामध्ये स्पष्टपणे दिसत आहे. वन विभागाने ट्रॅप कॅमेरे लावले आहेत. त्यात सेल नसल्याने बिबट्याच्या मुक्तसंचाराचा तपशील वन विभागाला मिळणे कठीण झाले आहे. www.konkantoday.com