
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण कळंबट येथे बोगस नोटा छपाई कारखाना,८५ लाख ४८ हजार रुपये किमतीच्याबनावट नोटा हस्तगत
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण कळंबट येथे बोगस नोटा छपाई कारखाना असल्याची बाब समोर आली आहे. या ठिकाणीनोटांची हुबेहूब छपाई करून मुंबई, ठाणे येथे या नोटा वटविण्यासाठी आलेल्या टोळीच्या म्होरक्याला ठाणे गुन्हे शाखावागळे युनिट पाचने बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्या चौकशी तून इतर दोन साथीदारांच्याही मुसक्या पोलिसांनी आवळल्याआहेत. या त्रिकुटाकडून ८५ लाख ४८ हजार रुपये किमतीच्याबनावट नोटा हस्तगत करण्यात आल्या असून या आरोपींनी
यापूर्वी बाजारात बनावट नोटा वटविल्याची शक्यता पोलिसांनी
व्यक्त केली आहे.चिपळूण येथील कळंबट गावात राहणारा सचिन आगरे यानेगावातच प्रिंटर, स्कॅनर आणि कॉम्प्युटरच्या मदतीने बनावट
नोटा छापण्याचा गोरखधंदा थाटला होता. या ठिकाणी त्यानेदोन हजार रुपये दराच्या बनावट नोटा छापल्या. या नोटासचिन ठाण्यात वटविण्यासाठी येणार असल्याची माहिती ठाणेगुन्हे शाखा वागळे युनिट पाचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकासघोडके यांना मिळाली. त्यांनी गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्तलक्ष्मीकांतपाटीलयांच्यामार्गदर्शनाखाली आणि सहायकपोलीस निरीक्षक प्रशांत पवार, अनिल सुरवसे, भूषण शिंदे,सहायक पोलीस उपनिरीक्षक बाबू चव्हाण, निवृत्ती महांगरे,देविदास जाधव, पोलीस हवालदार राजेश क्षत्रिय, विजयकुमार
गोव्हे, मनोज पवार, शिवाजी रायसिंग, दिलीप शिंदे, शशिकांतनागपुरे, राजेंद्र गायकवाड, अजित शिंदे, कल्पना तावरे, सागरसुरळकर, यश यादव या टीमच्या मदतीने कापूरबावडी येथे
सापळा रचला. या ठिकाणी नोटा घेऊन आलेल्या सचिन याला
पोलीस पथकाने बेड्या ठोकल्या.
सचिनला अटक करताच त्याचे साथीदार मन्सूर खान व चंद्रकांत
माने या दोघांनाही पोलिसांनी अटक केली
www.konkantoday.com