
नाटे येथील सदरची महिला खैरात मागणारी
राजापूर तालुक्यातील साखरीनाटे परिसरात संशयास्पद रित्या फिरणाऱ्या एका महिलेला पकडण्यात आल्याने व ही महिला मुले पळविणारी असावी या संशयाने या परिसरात एकच खळबळ उडाली होती मात्र सदरची महिला ही कोकण नगर येथील क्रांतीनगरमधील राहणारी व खैरात मागणारी निघाली ही महिला मुले पळवणारी आहे हा संशय शेवटी अफवा ठरली
स्थानिक ग्रामस्थ व महिलांनी या महिलेला पकडून नाटे सागरी पोलिसांच्या ताब्यात दिले असता पोलीस तपासात ही महिला रत्नागिरी क्रांतीनगर झोपडपट्टीत रहाणारी असल्याची माहिती पुढे आली आहे.ती साखरीनाटे परिसरात खैरात मागण्यासाठी फिरत असताना गैरसमजातुन तीला पकडण्यात आल्याचे पोलीस तपासात पुढे आले पोलीसांनी या महिलेला तीच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिले आहे.
www.konkantoday.com