संजय राऊत यांच्या आरोपावरून एकनाथ शिंदे यांच्या बॅगांची तपासणी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे तापोवनातील निलगिरी बाग येथील हेलिपॅडवर आगमन झाले आणि एकनाथ शिंदे यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आल्याने सर्वांचे लक्ष त्यांच्याकडे गेले. काहीच दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर पैसे वाटप केल्याचा आरोप केल्यानंतर ही तपासणी करण्यात आली आहे. दरम्यान नाशिकमध्ये एकनाथ शिंदेंचा जो आधीचा दौरा होता त्यावेळी त्यांच्याकडे त्यात 12 कोटी होते, असा आरोप संजय राऊत यांनी केला होता. त्या बॅगा कुठे गेल्या? कुणाला दिल्या? कुठल्या हॉटेलात गेल्या असा सवाल राऊतांनी विचारला आणि शिंदेवर गंभीर आरोप देखील केला. आता मुख्यंमत्र्यांच्या बॅगमध्ये कपडे, औषधे आणि जीवनावश्यक वस्तूंशिवाय काहीही सापडले नाही.संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर नाशिकमध्ये उतरल्यानंतर त्यातून सुरक्षा रक्षक बॅगा घेऊन जाताना दिसत आहेत. या बॅगांमध्ये पैसे असल्याचा दावा राऊत यांनी केला होता.