तक्रार अर्ज, दाखल केलेली व्हिडिओ क्लिप द्या, तक्रारदारांची मागणी
लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार शकील सावंत यांच्यावर केलेल्या टीकेमुळे माजी आमदार रमेश कदम व अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाध्यक्ष रईस अल्वी यांच्याविरोधात तक्रार दाखल झाली आहे. त्यामुळे मुख्याधिकारी तथा आचारसंहिता पथक प्रमुख विशाल भोसले यांनी या दोघांना नोटीस पाठवून दोन दिवसात याचा खुलासा मागवला आहे. मात्र खुलासा देण्यापूर्वी त्यांनी दाखल झालेली तक्रार व व्हिडिओ क्लिप द्या असे पत्र भोसले यांना दिले आहे. त्यामुळे ते दिल्यानंतर हे दोघे आपला खुलासा करणार आहेत असे रईस अलवी यांनी सांगितले.www.konkantoday.com