खेडमध्ये महावितरणच्या कार्यालयाबाहेर आंदोलन

खेड :  येथील महावितरणच्या कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर कर्मचार्‍यांनी एकत्र येऊन घोषणा दिल्या व संप यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त करत जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन केले. दि.2 जानेवारी 2023 रोजी वीज कर्मचार्‍यांच्या संघर्ष समितीने पुकारलेल्या आंदोलन व संपाबाबत महाराष्ट्र शासनाच्या प्रधान ऊर्जा सचिव व तिन्ही कंपन्यांचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तसेच इतर अधिकारी यांच्या संघर्ष समितीमध्ये सहभागी 31 संघटनांची बैठक झाली. बैठकीमध्ये ठोस आश्वासन न मिळाल्यामुळे वीज उद्योगातील कर्मचारी संघटनांच्या संघर्ष समितीने दि.3 जानेवारीच्या मध्यरात्रीपासून संप सुरू केला होता. त्यामध्ये खेडमधील 400 वीज कर्मचारी व अधिकारी सहभागी झाले होते. सुमारे 35 अभियंते, 20 अधिकारी व 345 हून अधिक नियमित व कंत्राटी कर्मचारी संपात सहभागी झाल्याने खेडमध्ये विजेचा लपंडाव सुरू झाला होता. बुधवारी दुपारी संप मागे घेण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button