चिपळूण शहरात अनेक अनधिकृत होर्डींग, नगरपरिषद कारवाईच्या तयारीत
चिपळूण शहरातील मुख्य भागांमध्ये अनधिकृत उभारलेल्या मोठमोठ्या फलकांचा बाजार दिसून येत आहे. नगर परिषदेची परवानगी न घेता हे फलक लावण्यात आल्याने व त्यांच्यावर इतक्या वर्षात ठोस कारवाई न झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे या अनधिकृत फलकांनी नगर परिषदेच्या इमारतीही भरल्या आहेत. मुंबईतील घटनेनंतर मंगळवारी काहीनी हे फलक स्वतःहून काढण्यास सुरूवात केली आहे. तर प्रशासनानेही संबंधितांना नोटीस धाडण्यास सुरूवात केली आहे.शहराचा विचार करता चिंचनाका, मार्कंडी, काविळतळी, भोगाळे, जुना बसस्थानक, बाजारपूल, बहाद्दूरशेखनाका, पॉवरहाऊस आदी ठिकाणी महत्वाची व जाहिरातीसाठी फायद्याची समजली जातात. त्यामुळे या भागांमध्ये कायमच जाहिरात फलकांची गर्दी दिसून येते. सध्यतर यातील बहुतांशी भागात मोठमोठे फलक लावण्यात आले आहेत. हे सर्व अनधिकृत असल्याचे नगर परिषदेकडून सांगण्यात आले आहे. www.konkantoday.com