
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग अनेक ठिकाणी रस्त्याला तडे
नव्याने तयार करण्यात आलेला मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग अनेक ठिकाणी खचला असून रस्त्याला तडे गेल्याने तो अधिक धोकादायक झाला आहे.गेल्या तेरा वर्षापासून सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरण कामाने अधिक गती घेतली असून आरवली ते पाली दरम्यान काही ठिकाणी एक मार्गिका पूर्ण झाली आहे. डिसेंबर अखेरपर्यंत राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून ठेकेदार कंपनीने चौपदरीकरणाच्या कामातील दर्जाकडे पूर्णतः दुर्लक्ष केले आहे. राष्ट्रीय महामार्गाला अनेक ठिकाणी मोठे तडे गेले असून खचलेल्या भागात गाड्या उड्या मारत आहेत.www.konkantoday.com