
फिनोलेक्स ऍकॅडमीने दिली विद्यार्थ्यांना नोकरीची संधी
रत्नागिरी ः फिनोलेक्स ऍकॅडमी ऑफ मॅनेजमेंट ऍण्ड टेक्नॉलॉजी रत्नागिरी या अभियांत्रिकी महाविद्यालयाने सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात कँपस प्लेसमेंट ड्राईव्हद्वारे विविध शाखांमधील ३०० हून अधिक विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे.
शिक्षण घेताना जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना नोकरीची संधी मिळावी यासाठी ऍकॅडमी कटीबद्ध असते. त्यादृष्टीने वर्षभर विद्यार्थ्यांकडून कौशल्याचा विकास व्हावा म्हणून कसून सराव घेतला जातो.
याकरिता विद्यार्थ्यांसाठी विविध ट्रेनिंग प्रोग्रॅमचे आयोजन केले जाते. त्यात ऍप्टिट्यूड ट्रेनिंग, ग्रुप डिस्कशन, इंटरव्हयू, सॉफ्ट स्किल्स ट्रेनिंग, व्यक्तीमत्व विकास आदींवर भर दिला जातो. इंडस्ट्री एक्स्पर्ट, शैक्षणिक क्षेत्रांद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन दिले जाते.