
दापोली आगारातून पंढरपूर तुळजापूर बस सेवा सुरू…
दापोली :- दापोली आगारातून सकाळी ०६.०० वाजता व सायंकाळी ०६.०० दापोली , खेड, चिपळूण, कोयना, पाटण, कराड, विटा, पंढरपूर, सोलापूर मार्गे तुळजापूर व तुळजापूर येथून सकाळी ०७.०० व रात्री ०८.०० वाजता सुटणारी तुळजापूर दापोली या बस सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. तसेच दुपारी ०१.०० वाजता दापोली, खेड, महाड, स्वारगेट व रात्री १०.०० स्वारगेट, महाड, खेड, दापोली अशी फेरी सुरू करण्यात आली आहे. या फेऱ्यांचा जास्तीतजास्त प्रवाशांनी घ्यावा असे आवाहन दापोली आगारा तर्फे करण्यात आले आहे.