
एकाच दिवशी तब्बल ५२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने कोल्हापूर हादरले
रेड झोनमधून कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या नागरिकांमुळे कोरोनाचा सोमवारी जणू कहर झाला. एकाच दिवशी तब्बल ५२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने शहरासह जिल्ह्यात अक्षरशः हाहाकार उडाला आहे. जिल्ह्यात आजवरची एकाच दिवसात आढळलेली बाधितांची ही सर्वोच्च संख्या ठरली आहे. जिल्ह्याबाहेरून, विशेषतः रेड झोनमधून येणार्या लोंढ्यांनी जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा चोवीस तासांत शतकापार नेला आहे.
गगनबावडा वगळता कोल्हापूर शहर आणि प्रत्येक तालुक्यात रुग्ण आढळल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. जिल्ह्याचा कोरोनाबाधितांचा आकडा सोमवारी रात्री १०१वर गेला.
www.konkantoday.com