
प्रत्येक रूग्णांच्या उपचारात परिचारिकांची निःस्वार्थ सेवा -डॉ. अनिरूद्ध आठल्ये
प्रत्येक रूग्णांच्या उपचारात असंख्य परिचारिकांनी समर्पण भावनेतून निःस्वार्थी सेवा बजावली त्यामुळे खर्या अर्थाने त्या सकारात्मक पात्र आहेत, असे मत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरूद्ध आठल्ये यांनी व्यक्त केले.जिल्हा प्रशिक्षण केंद्रात डॉ. अनिरूद्ध आठल्ये यांच्या अध्यक्षतेखाली परिचारिका दिन साजरा करण्यात आला. अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र गावडे, प्रशिक्षण केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. देवीदास चरके, साथरोग अधिकाारी डॉ. मिताली मोडक, आरोग्य पर्यवेक्षक राजेश सावंत, सार्वजनिक आरोग्य परिचारिका श्वेता तारये, प्रिया पेडणेकर, आरोग्य सहाय्यिका बेबीनंदा खामकर, आरोग्य सेविका दिशा कवडेकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. सर्व परिचारिकांचे भेटवस्तू, पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. नर्सिंग क्षेत्रातील अनुभव परिचाारिकांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला. डॉ. महेंद्र गावडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. www.konkantoday.com