सोमवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे पेढे, वालोपेत पंचवीसहून अधिक दुचाकीस्वार घसरले

सोमवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणात सुरू असलेल्या कामामुळे पेढे येथील सर्व्हिस रोड चिखलाने माखला. यामध्ये तब्बल २५ हून अधिक दुचाकीस्वार घसरून पडले. चौपदरीकरणातील एका मार्गिकेचे काम सुरु असताना भरावाची माती पावसात खाली आल्याने असंख्य वाहनचालकांना त्याचा फटका बसला. त्याचबरोबर वालोपे येथील पेट्रोल पंपासमोरही रेल्वेस्टेशनकडून येणारा सर्व्हिस रोड चिखलाने माखून गेला होता.पेढे-परशुराम ते खेरशेत या टप्प्यात पेढे फरशी तिठा येथे मोठा भराव टाकून चौपदरीकरण करण्यात येत आहे. त्यातील एक मार्गिका वाहतुकीस खुली करण्यात आली असून दुसर्‍या मार्गिकेचे काम सुरू आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात भराव करण्यात आला आहे. शनिवारी तसेच सोमवारी सायंकाळी कोसळलेल्या पावसात भराावाची माती थेट सर्व्हिस रोडवर आल्यानंतर सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button