गुहागर तालुक्यातील पालशेत येथील आंबा बागेत राहणार्‍या नवविवाहितेने अज्ञात कारणातून विष प्राशन केल्याने मृत्यू

गुहागर तालुक्यातील पालशेत येथील आंबा बागेत राहणार्‍या नवविवाहितेने अज्ञात कारणातून विष प्राशन केले. तिचा उपचारांदरम्यान मंगळवारी पहाटे 4 वा. जिल्हा शासकिय रुग्णालयात मृत्यू झाला.सुजाता सुधीर पोवार (27,मुळ रा. कोळकेवाडी,चिपळूण) असे उपचारांदरम्यान मृत्यू झालेल्या विवाहितेचे नाव आहे. सुजाताचा पती सुधीर हा गुहागर येथील पालशेत येथे आंबा बागेत नोकरीला होता. त्यामुळे तिही त्याच्या सोबत तिथेच वास्तव्याला होता सोमवार 13 मे रोजी सायंकाळी 4 वा. सुमारास सुजाताने अज्ञात कारणातून बागेतच विषारी औषध प्राशन केले.ही बाब तिच्या पतीच्या लक्षात येताच त्याने तिला प्रथम गुहागर प्राथमिक आरोग्य केंद्र त्यानंतर चिपळूण येथील कामथे रुग्णालयातून अधिक उपचारांसाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतू उपचारांदरम्यान मंगळवारी पहाटे तिचा मृत्यू झाला.www.konkantoday com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button