कोकणातील पहिले शिवसेना शाखाप्रमुख गोपीचंद राजेशिर्के यांचे निधन
शिवसेनेच्या स्थापनेनंतर रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या कोकणात स्थापन झालेल्या पहिल्या व स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते उदघाटन झालेल्या खेर्डी शिवसेना शाखेचे पहिले शाखाप्रमुख गोपीचंद राजेजिर्के (७४) यांचे सोमवारी सकाळी कान्हे फाटा येथील निवासस्थानी हृदयविकाराने निधन झाले.१९६६ साली शिवसेनेचा जन्म झाल्यानंतर कोकणात शाखांचा विस्तार करण्याचा विचार सुरू झााला. त्यातूनच मग कोकणातील पहिली शिवसेनेची शाखा चिपळूण तालुक्यातील खेर्डी येथे स्थापन झाली. या शाखेच्या उदघाटनाला खुद्द स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आले होते. या पहिल्या शाखेचे शाखाप्रमुख राजेशिर्के होते. www.konkantoday.com