आठवडा बाजार ८० फुटी रोड ते धमालणीचा पारकडे जाणाऱ्या रस्त्यामधील येणारा डिपी पोल हटवा व इतर प्रलंबित कामे पूर्ण करा

रत्नागिरी : आठवडा बाजार रोड ते धमालणीचा पारकडे जाणाऱ्या रस्त्यामधील येणारा डिपी पोल हटवा व इतर प्रलंबित कामे पूर्ण करा. अशी मागणी भाजप जिल्हा चिटणीस श्री. परशुराम प्रभाकर ढेकणे यांनी केली आहे. आठवडा बाजार ८० फुटी रोड ते धमालणीचा पारकडे जाणाऱ्या रोडच्या सुरवातीला (Entrance) रस्त्यामधील येणारा डिपी पोल असल्याकारणाने रस्ता अरुंद होतो त्यामुळे वाहतुकीला तसेच शाळेच्या मुलांना जाण्यायेण्यासाठी खुप त्रास होतो आहे तरी डिपी पोल हटविण्यात यावे, तसेच पटवर्धन हायस्कुल प्रवेशद्वारा समोरील गटार चे प्रलंबित काम पुर्ण करण्यात यावे व नवनीत स्टेशनरीच्या समोरील रस्त्यामधील पोल हा खुप अडचणीचा ठरत असून त्यामुळे तेथे लहान-मोठे अपघात होतात. रस्त्याचे रुंदीकरण झाले आहे. परंतु, रस्त्याच्या मध्ये पोल असलेमुळे रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा निर्माण होतो आहे. त्यामुळे तो पोल हलविण्यात यावा. सदर विनंतीपूर्वक अर्जाचा विचार करून नागरिकांची होणारी गैरसोय दूर करण्यात यावी, अशी मागणी भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या मार्गदर्शनात भाजपचे दादा ढेकणे यांनी रत्नागिरी नगर परिषद व महावितरणकडे केली आहे. यावेळी योगेश हळदवणेकर, डॉ. ऋषिकेश केळकर, निलेश आखाडे,भालचंद्र साळवी आदी उपस्थित होते.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button