घरगुती गॅस सिलेंडचा तुटवडा असतानादेखील भंगार कटाईसाठी एलपीजीचा वापर?
एकीकडे घरगुती गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे ग्राहक हैराण झालेले असताना दापोली तालुक्यातील उसगाव-दाभोळ येथे एका बड्या कंपनीत एलपीजी गॅस सिलिंडरचा वापर करून धोकादायक व बेकायदेशीर पद्धतीने भंगार कापणी होत असल्याबाबतची तक्रार स्वराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याध्यक्ष अनिश निंबकर यांनी जिल्हाधिकार्यांकडे केली आहे.याबाबतचे निवेदन वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय व पेट्रोलियम आणि एक्प्लोसिव्ह सेफ्टी ऑईनायझेशन व प्रांताधिकारी, तहसीलदार यांच्याकडे देण्यात आले आहे.निवेदनात निंबकर यांनी म्हटले आहे की, उसगाव दाभोळ येथील या कंपनीत भंगार मटेरिअल कापणीचे काम सुरू आहे. भंगार कापताना डी ऍसेटेलीन या सिलिंडरचा वापर करणे गरजेचे असताना तो गॅस महाग पडत असल्यामुळे सदर कंपीनी व्यवस्थापनाकडून राजरोसपणे घरगुती वापराचा एलपीजी गॅस सिलिंडर वापरून भंगार कापण्ययाचे काम करण्यात येत आहे.आधीच घरगुती गॅस सिलिंडरचा तुटवडा असताना स्थानिक गॅस वितरकांकडून त्या कंपनीला मोठ्या प्रमाणात एलपीजी गॅस सिलिंडर विक्री करून त्याद्वारे भंगार कापणी सुरू असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. www.konkantoday.com