
दापोली, मंडणगड, गुहागर मच्छिमार संघर्ष समितीने एल.ई.डी व फास्टर नौकांच्या अवैध मासेमारी विरोधात साखळी उपोषण सुरू
दापोली, मंडणगड, गुहागर मच्छिमार संघर्ष समितीने एल.ई.डी व फास्टर नौकांच्या अवैध मासेमारी विरोधात काल २२ मार्च पासून दापोली तहसील कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे. तसे समितीकडून दापोली तहसीलदार व प्रांत यांना निवेदन देण्यात आले होते.
दापोली मंडणगड गुहागर मच्छिमार संघर्ष समितीने फास्टर आणि पर्ससीन नौकाच्या होणाऱ्या अतिक्रमणामुळे हा पवित्रा घ्यावा लागत असल्याचे या निवेदनामध्ये व्यक्त केलं आहे. महाराष्ट्र राज्यातील सागरी हद्दीमध्ये परप्रांतीय हायस्पीड बोटी व एलईडी लाईटव्दारे केली जाणारी पर्ससीन नेट मासेमारी या अनियंत्रीत बेकायदेशीर मासेमारीमुळे सागरी मत्स्योत्पादनात कमालीची घट झाली आहे.
www.konkantoday.com