लागून आलेल्या सुट्ट्यामुळे गणपतीपुळे परिसर पर्यटकांनी बहरला
विनायकी चतुर्थीला जोडून शनिवार, रविवारी सुट्ट्या आल्यामुळे प्रसिध्द गणपतीपुळे पर्यटनस्थळा प्रथमच पर्यटकांनी गजबजले. सलग दोन दिवस सुमारे वीस हजार पर्यटकांनी दररोज हजेरी लावली. यामध्ये सर्वाधिक पश्चिम व उत्तर महाराष्ट्रातील पर्यटक वर्गाचा समावेश होता. यंदा हंगामातील पहिलीच गर्दी झाल्यामुळे गणपतीपुळ्यातील व्यावसायीक सुखावले आहेत.महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागावरील निवडणुका तिन टप्प्यात विभागल्या गेल्या आहेत. त्याचा परिणाम पर्यटनावर झाला असून कोकणातील पर्यटकस्थळांवर गर्दीचा लवलेश नव्हता. दरवर्षी 7 मे नंतर कोकणातील किनारे पर्यटकांनी फुलून जातात. मात्र ही गर्दी कुठेच नव्हती. 7 मे रोजी कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील मतदान झाल्यानंतर पर्यटकांची पावले समुद्रकिनार्यांकडे वळू लागली आहेत. शनिवारी विनायकी चतुर्थी होती. त्यानंतर जोडून रविवार आल्यामुळे पर्यटकांनी गणपतीपुळेला प्राधान्य दिले होते. कोल्हापूर, सातारा, सांगली या परिसरातील बहूसंख्य पर्यटक गणपतीपुळेत दाखल झाले होते.www.konkantoday.com