
बावनदी येथे दारूच्या नशेत ट्रक चालवणाऱ्यावर गुन्हा
रत्नागिरी : दारूच्या नशेत ट्रक चालवणाऱ्या चालकाविरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई रविवार 29 जानेवारी रोजी दुपारी 3 वा.बावनदी येथील संग्राम धाब्यासमोर करण्यात आली. धनाजी सुदाम रावळ (32 ,रा. मोहोळ, सोलापूर ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या ट्रक चालकाचे नाव आहे. त्याच्या विरोधात पोलीस हवालदार मोहन पाटील यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, रविवारी दुपारी धनाजी रावळ आपल्या ताब्यातील ट्रक (एमएच-04-एलई-9188) घेऊन दारूच्या नशेत हातखंबा ते बावनदी असा जात होता. त्यावेळी ग्रामीण पोलिसांनी बावनदी येथील संग्राम धाब्यासमोरील रस्त्यावर ही कारवाई केली. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास ग्रामीण पोलीस करत आहेत.