
दारू पिऊन पत्नीशी वाद घातला, पत्नी निघून गेल्यावर गळफास घेऊन केली आत्महत्या
रत्नागिरी तालुक्यातील हातखंबा येथे तरुणाने घरगुती वादातून राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना शुक्रवार 10 मे रोजी रात्री 11 वा.घडली.गुलशन राजकुमार पटेल (22, रा.हातखंबा दर्गा, रत्नागिरी) असे गळफास घेत आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. गुशलन पटेल हा गेल्या चार महिन्यांपासून रत्नागिरीमध्ये हेल्पर म्हणून कामाला होता. शुक्रवारी रात्री कामावरुन तो दारुच्या नशेत घरी गेला. यावरुन पत्नीशी त्याचा वाद-विवाद होउन त्याने पत्नी शितल हिला मारहाण केली. त्यामुळे ती घराबाहेर गेल्याने रागाच्या भरात त्याने राहत्या घरातील छताच्या हुकला जाडसर मफलरने गळफास घेत आत्महत्या केली.www.konkantoday.com