डिसेंबर मध्ये झालेल्या फसवणुकीची आता तक्रार दाखल

बँकेतून बोलत असल्याची बतावणी करुन क्रेडिट कार्डची माहिती घेत अज्ञात महिलेने प्रौढाची तब्बल 41 हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना शनिवार 4 डिसेंबर 2023 रोजी दुपारी 12.30 वा. सुमारास मांडवी येथे घडली होती. याप्रकरणी फिर्यादीने 5 महिन्यांची शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.गिरीश भिवा सावंत (51,रा.मांडवी,रत्नागिरी) असे फिर्यादीचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, पाच महिन्यांपूर्वी अज्ञात महिलेने दुपारच्या सुमारास त्यांच्या मोबाईलवर फोन केला. तिने आपण एका बँकेतून बोलत असल्याचे सांगून फिर्यादीकडून कार्डचा 16 अंकी नंबर,जन्म तारिख, कार्डची व्हॅलिडिटी अशी माहिती विचारुन घेतली. तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवत गिरीश सावंत यांनी सर्व माहिती त्या महिलेला दिल्यावर त्यांची 40 हजार 800 रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली होती. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button