
रत्नागिरी शहरातील विद्युत प्रवाह सतत खंडीत,महावितरणला मेन्टनन्सचा सोमवारचा मुहूर्त असल्याने शासकीय कार्यालयांतील लोकांच्या कामाची गैरसोय
गेले दोन दिवस झालेल्या पावसानंतर रत्नागिरी शहरात आज उघाडी पडलेली असतानादेखील सकाळपासून अनेकवेळा वारंवार वीज खंडित होण्याचे प्रकार घडत आहेत त्यामुळे विजेवर आधारित असणार्या अनेक उपकरणाला त्याचा फटका बसत आहे आज सकाळपासून दहा ते पंधरा वेळा विद्युतप्रवाह खंडित होण्याचे प्रकार घडले आहेत त्याचा फटका सामान्य वीज ग्राहकांना बसत आहे
दुसरे म्हणजे महावितरणतर्फे दरवेळी सोमवारी मेंटनन्ससाठी अनेक वेळेला विद्युत प्रवाह खंडीत केला जातो सोमवार हा वार महावितरणने कशासाठी निवडलाय हे कळू शकत नाही शासकीय कार्यालयाना शनिवार व रविवारी सुट्या असतात त्यामुळे लोकांची कामे सोमवारी होत असतात दोन दिवस सुट्या घेतल्यानंतर सरकारी अधिकारी सोमवारी कार्यालयात येत असतात त्यामुळे आपली कामे होतील या आशेने खेडोपाड्यातून माणूस सरकारी कार्यालयात येतो महावितरणला शनिवार हा वार
मेंटनन्ससाठी राखून ठेवणे सोयीचे असतानादेखील सोमवारीच मेंटनन्ससाठी विद्युत पुरवठा खंडित केला जाताे शासनाच्या धोरणाप्रमाणेशासकीय कामकाज कम्प्युटराईज केले जात आहे त्यामुळे सोमवारी विद्युत प्रवाह खंडीत झाला तर शिवाय शासकीय कार्यालयात कामासाठी येणार्या सर्वसामान्य नागरिकांची कामे त्या दिवशी होत नाहीत त्यामुळे त्यांना मोठा आर्थिक व वेळेचा फटका बसतो व मोठ्या गैरसोयीला तोंड द्यावे लागत आहे त्यामुळे महावितरणने सोमवारचा मेंटनन्सचा वार बदलून शनिवारी करावा अशी मागणी होत आहे
www.konkantoday.com




