
कुंभारखाणी बुद्रुक येथे भरदिवसा बिबट्याने पाडला गाईचा फडशा
संगमेश्वर तालुक्यातील कुंभारखाणी बुद्रुक येथे भरदिवसा बिबट्याने गाईवर हल्ला करून तिला ठार मारल्याची घटना शुक्रवार दिनांक ७ जानेवारी रोजी घडली आहे. मधलीवाडी येथील शेतकरी विजय रामचंद्र सुर्वे यांनी आपली गुरे नेहमीप्रमाणे शुक्रवारी सकाळी चरण्यासाठी सोडली होती. दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास बिबट्याने गाईवर हल्ला करून तिला ठार मारले आहे. अन्य जनावरे घराच्या दिशेने धावत सुटली. ही बाब विजय सुर्वे व ग्रामस्थांच्या निदर्शनास आली. त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी त्यांना गाय मृतावस्थेत दिसून आली. गाईच्या मानेवर बिबट्याचे पंजे व दात लागल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. या प्रकारामुळे शेतकरी बांधवांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
www.konkantoday.com