संगमेश्वर बस स्थानकाजवळील खड्ड्यांमुळे धोका
संगमेश्वर एसटी बस स्थानकाजवळ कोणतीही सुरक्षा न घेता काढण्यात आलेला मोठा खड्डा रात्रीच्या वेळ वीजेची सुविधा नसल्याने परिसरातील प्रवास अधिक धोकादायक झाला आहे.संगमेश्वर एसटी बस स्थानकाजवळ मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम करीत असताना आवश्यक असलेली सुरक्षा घेण्यात आलेली नाही. संगमेश्वर एसटी बस स्थानकाकडे जाणारा रस्ता, देवरूखकडील मार्ग यामध्ये सोनवी पुलाचा पिलर उभारण्यासाठी मोठा खड्डा काढण्यात आला आहे. www.konkantoday.com