
कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पडणार्या पावसाचा हापूस पिकाच्या आंब्यावर परिणाम
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकण किनारपट्टीवर पावसाची संततधार सुरू आहे. या हवामान बिघाडास सर्वाधिक परिणाम कोकणातील मोठ्या आर्थिक स्त्रोत समजल्या जाणार्या हापूस आंबा उद्योगावर होत आहे. सध्या पडत असलेला पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे हापूस बागायती नव्याने फुटलेली पालवी कुजत असून पुढील हंगामातील उत्पादनाला गंभीर फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हापूस आंब्याच्या बहरासाठी आवश्यक असलेला आक्टोबर हिटचा ताण या पावसामुळे पूर्णतः हरवला आहे. आंब्याच्या बहरासाठी आवश्यक असलेला ऑक्टोबर हिटचा ताण या पावसामुळे पूर्णतः हरवला आहे. आंब्याच्या झाडांच्या मुळांना उष्णतेची झळ झेलल्याशिवाय पुढील फुलोरा आणि फलधारणा सुरळीत होत नाही.www.konkantoday.com




