शासनाचा कर वसुलीसाठीचा सर्व्हर बंद पडल्याने चिपळुणात वसुलीला लागला ब्रेक
शासनाचा कर वसुलीसाठी असलेला सर्व्हर गेल्या सव्वा महिन्यापासून बंद आहे. त्यामुळे पैसे भरल्यास पावत्याच येणे शक्य नसल्याने वसुलीला ब्रेक लागला आहे. यामुळे कर भरण्यासाठी नगर परिषदेत येणार्या नागरिकांना नाहक हेलपाटे मारावे लागत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.दरवर्षी मार्च महिनाअखेरीपर्यंत १०० टक्के वसुली करा अन्यथा विविध योजनाखालील विकास निधी मिळणार नाही. काम केले नाही म्हणून अधिकार्यांवर कारवाई केली जाईल असा दम वरिष्ठ अधिकारी मुख्याधिकार्यांना भरतात. त्यामुळे प्रत्येक ठिकाणचे मुख्याधिकारी अन्य अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून दिवस-रात्र कर वसुलीचे काम करून घेतात. त्यामुळे साहजिकच मोठी रक्कम शासनाच्या तिजोरीत पडते. असे असतानाही वसुली करतानाही अनेकदा संबंधित अधिकारी, कर्मचार्यांना सर्व्हर बंदचा सामना करावा लागला. www.konkantoday.com