
*माकडे पळवण्यासाठी बागायतदारांकडून देशी जुगाडला पसंती*
___माकड, वानरांनी आपला मोर्चा आता नागरी वस्तीकडे वळवला असल्याने या बागायतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. हे टाळण्यासाठी बागायतदारांकडून देशी जुगाड वापरला जात आहे.फटाक्यासारखा मोठा आवाज करणारे यंत्र बाजारात ठिकठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध असून त्याला मोठी पसंती मिळते आहे.शेतशिवारात माकडांचा उपद्रव वाढला आहे.नागरीवस्तीत विपुल प्रमाणात अन्न मिळत असल्याने माकड-वानरांच्या संख्येत भयंकर वाढ होत आहे.मोठे आवाज झाले तर ही उपद्रवी माकडे पळून जातात त्यासाठी अनेक ठिकाणी फटाके वाजवले जातात.आता प्लास्टीकच्या पाइपपासून बनवलेले पिचकारीसारखे छोटेखानी यंत्र शेतकरयांच्या पसंतीस उतरत आहे.प्लास्टीकच्या पाइपचा छोटा तुकडा घेवून तो दोन्ही बाजूने बंदिस्त केलेला असतो. पाइपवर एक छिद्र पाडून त्यातून कॅल्शियम काबाईडचे तुकडे टाकून त्यात थोडं पाणी ओतून झाकण बंद केले जाते. हा पाइप हलवला की त्यात ऍसिटीलीन गॅस तयार होतो. या गॅसवर पाईपच्या एका बाजूने असलेल्या बटणाने दाब दिला की गॅस बाहेर पडतो.गॅस बाहेर पडत असताना फटाक्यासारखा मोठा आवाज होतो. या आवाजाने माकडे घाबरून पळून जातात. बाजारात हे यंत्र अवघ्या २०० रूपयाला विकत मिळते.वानरं पिकांवर ताव मारून त्यांची नासधूस करीत आहेत. अशात हा देशी जुगाड शेतकर्यांना पंसती मिळत आहेत.www.konkantoday.com