
शकील सावंत, ऍड. ओवेस पेचकर यांची तक्रार
महाविकास आघाडीचे नेते, माजी आमदार रमेशभाई कदम व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे अल्पसंख्यांक सेल जिल्हाध्यक्ष रईस अलवी यांच्याविरोधात धार्मिक, प्रक्षोभक व धमकीच्या विधानासंदर्भात निवडणूक निर्णय अधिकार्यांकडे कोकण प्रादेशिक पक्षाचे अध्यक्ष ऍड. ओवेस पेचकर व उमेदवार शकील सावंत यांनी तक्रार दिली होती. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी आकाश लिंगाडे यांना दिले असून आपण चौकशी करून आपला अहवाल जिल्हाधिकार्यांना सादर करणार असल्याचे श्री. लिंगाडे यांनी सांगितले.www.konkantoday.com